Wednesday, 28 December 2016

पुणे आणि ट्रॅफिक
आज दिवाळीच्या पावन दिवशी 'पुण्यात' गाडी चालवण्याचा 'योग'आला😢.तसे दुचाकी चालवली होती पण फरक पडतोच.तर तो योग 'ओला' वाल्यांनी आणून दिला,आयत्यावेळी 'late'येऊन.
आम्ही निघालो.प्रत्येक रोडवर 'हा रोड माझाच'अश्या थाटात 'पुणेकर'गाडी चालवत होते.
वळताना हात किंवा इंडिकेटर दाखवणे म्हणजे अपमान असा काहीसा तो भाव.गाडी रस्त्याच्या मधे आणून हळू चालवणे हा तर आवडता छंद.सिग्नल हा आपल्यासाठी नसून 'तो ज्याच्यासाठी आहे त्याने बघून घेणे' असेही चालू असते.लाल सिग्नल दिसल्यावर सहसा गाडी थांबवतो पण इथे तो दिसल्यावरच Accelator वाढवले जाते.बर दिवाळी निमित्त 'मामा' पण दिसत नव्हते त्यामुळे 'चेव'तर चढणारच.चालवणाऱ्याला सहसा मागे पुढे बघावे लागते पण इथे म्हणजे आजू बाजूला,छोट्या गल्लीतून येणाऱ्या लोकांचा पण अंदाज घेत गाडी चालवावी लागते.इथे लोक पलीकडच्या दुकानातल्या गोष्टी बघत रस्ता ओलांडतात(सायकल आणि पादचारी दोघेही).त्यामुळं त्यांची पण 'मन कि बात'ओळखत गाडी चालवावी लागते.त्यात जर कोणी तुम्हाला (तसे कमीच)जायला रस्ता दिलाच,पुढे जाऊ दिलेच तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही(एवढा respect)

तर असे हे स्मार्ट पुणे.सुधारणार तर नाहीत पण अजून बिघडले नाही तरी भरून पावलो.
पहिल्यांदा असे काही लिहिले आहे,
आवडले तर नक्की कळवा आणि नाही आवडले तरी.☺

2 comments:

  1. Mast... I am definitely getting my pune friends to read it... though will no hope that anything will change. .

    ReplyDelete